राजस्थानच्या बुंदी येथे गुरुकूलमध्ये अचानक लागली आग, तीन विद्यार्थी होरपळले

राजस्थानच्या बुंदी येथे गुरुकूलमध्ये अचानक लागली आग, तीन विद्यार्थी होरपळले

राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यात एका गुरुकूलमध्ये आग लागल्याची घटना घडली असून तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य मुलांवर उपचार सुरु आहेत.  पोलीस या घटनेचा तपास करत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

राजस्थानच्या तलवास गावामध्ये एक प्राचीन गुरुकूल आहे, तिथे वेदपाठासोबतच अन्य विषयांववर तिथे शिकवले जाते. तिथे मुलं शिकून तिथेच राहतात. मुलांना तेथील निय म पाळावे लागतात. त्यांना वेदपाठात निपुण केले जाते. त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. याच गुरुकुलमध्ये आज अचानक आग लागली. त्यावेळी खोलीत सहा मुलं होती. त्यांच्या गाद्या जळालेल्या अवस्थेत सापडले आहेत. गाद्या जळाल्याने तीन मुलांचा होरपळली असून त्यांनी बूंदीच्या जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

आज सकाळी देई पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. पोलीस या घटनेचा तपास करत आङेत. मुलांशी चौकशी केली असता अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आग नेमकी कोणी लावली याबाबत अद्याप पत्ता लागलेला नाही. आगीत होरपळल्याने शिवशंकर, अभिजीत आणि नितेश हे जखमी झाले आहेत. तिघंही राजस्थानच्या वेगवेगळ्या शहरात राहतात. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन मुलांचे स्टेटमेण्ट घेतले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;