जादू की झप्पी आणि पप्पी कुणाला? गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मध्ये जाणार; डंके की चोट पर घेणार मानधन

जादू की झप्पी आणि पप्पी कुणाला? गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मध्ये जाणार; डंके की चोट पर घेणार मानधन

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉसला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस हिंदी कार्यक्रमाच्या १८ व्या पर्वाची चर्चा सतत चर्चा आहे. येत्या काही दिवसातच बिग बॉस हिंदीचे १८ वे पर्व सुरु होणार आहे. बिग बॉस हिंदीच्या आगामी पर्वासाठी पहिला स्पर्धक अखेर समोर आला आहे. त्या स्पर्धकाने स्वत:च याबद्दलची घोषणा केली आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते हे आता एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतंच एक मोठी घोषणा केली आहे. गुणरत्न सदावर्ते हे लवकरच बिग बॉस हिंदीच्या 18 व्या पर्वात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता कार्यक्रमाला वेगळीच रंगत पाहायला मिळत आहे.

बिग बॉस हिंदीच्या १८ व्या पर्वात गुणरत्न सदावर्ते हे स्पर्धक म्हणून जाणार आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी इतर स्पर्धकांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन घेतले आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांची त्यांच्या पत्नीला मिठी मारली आणि निरोप घेतला.

गुणरत्न सदावर्ते नेमके कोण?

गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांच्या संपात सहभागी होऊन आपली स्वत:च वेगळं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण केलं होतं. आपण कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या पाठिशी असलेला वकील असून डॉ. बाबासाहेबांचं संविधान हेच सर्वोत्कृष्ट मानतो, असे ते नेहमी बोलताना दिसतात. ते कायमच कायद्याची भाषा बोलत असतात. गुणरत्न सदावर्ते हे ओरडून बोलण्याच्या आणि वेगळ्याच स्टाईलमुळेही कायमच चर्चेत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;