एकनाथांच्या नावानं तोतयागिरी करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं जगदंबेला साकडं

एकनाथांच्या नावानं तोतयागिरी करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं जगदंबेला साकडं

गेल्या दोन-अडीच वर्षआपासून आम्ही न्यायमंदिराची दारं ठोठावत आहोत. हात दुखायला लागले आहेत. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्ही ठरवले की जगदंबेलाच साकडे घातले पाहिजे, तू तरी दार उघड, असे म्हणत एकनाथांच्या नावाने तोतयागिरी करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आई जगदंबेला आणि जनता जनार्दनाला साकडे घातले.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी घटनास्थापनेच्या मुहूर्तावर आई जगदंबेसाठी तयार करण्यात आलेल्या गाण्याचे अनावरण करण्यात आले. ‘असुरांचा संहार कराया मशाल हाती दे, सत्वर भूवरी ये गं सत्वर भूवरी ये’, असे या गाण्याचे बोल असून हे गीत श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहे, तर नंदेश उमप यांनी गायले आहे. या दोघांचाही उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;