माझा धर्म भ्रष्ट केला…मंदिरातील सेवकाने मागवला होता पनीर रोल मिळाला एग रोल

माझा धर्म भ्रष्ट केला…मंदिरातील सेवकाने मागवला होता पनीर रोल मिळाला एग रोल

मेरठमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका तरुणाने बुधवारी ऑनलाईन पनीर रोल ऑर्डर केला होता. मात्र तो रोल खाल्ल्यानंतर तो एग रोल असल्याचे लक्षात आले आणि एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तो प्रचंड संतापला आणि हे प्रकरण पोलिसापर्यंत पोहोचले.

तक्रारदार तरुण नितीश दिल्ली येथील विश्व एन्क्लेव्ह येथील कँट येथील एका मंदिरात सेवक आहे. बुधवारी रात्री नितीश याने ऑनलाईन पनीर रोल ऑर्डर केले. ऑनलाईन डिलिव्हरी करणारी कंपनी ‘बाप ऑफ रोल्स रेस्टॉरेण्ट’ येथून मागवले होते. नितीशने पार्सल खोलून पनीर रोल खाल्ले मात्र त्यात त्याची चव वेगळी लागली. त्यानंतर त्याने नीट पाहिले असता तो पनीर रोल नसून एग रोल असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नितीश दोन साथीदारांसोबत रेस्टॉरेण्टमध्ये पोहोचला आणि त्याने एकच गोंधळ घातला. माहिती मिळाल्यानंतर हिंदू संघटनेचे कार्यकर्ते योगेश ठाकूर, शिवा कश्यप, आयुष अग्रवाल, रक्षित मित्तल आणि अन्य रेस्टॉरेण्टपर्यंत पोहोचले आणि धर्म भ्रष्ट केल्याचा आरोप लावत कारवाई करण्याची मागणी करु लागले.

अखेर घटनास्थळी पोलिसांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण शांत केले. पोलिसांनी चौकशी केली असता रेस्टॉरेण्टच्या संचालकांनी पार्सलची अदलाबदली झाल्याचे सांगितले. पोलीस शंशांक द्विवेदी यांच्या म्हणण्यानुसार, रेस्टॉरेण्टमधील गोंधळाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले होते. पिडीत तरुणाची तक्रार मिळाली असून तपासानंतर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;