बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन

बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन

भूम परंडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार, बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक ज्ञानेश्वर (तात्या) रावसाहेब पाटील यांचे निधन झाले आहे. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी सकाळी 11 वाजता परंडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

फुफ्फुसाला संसर्ग झाल्याने ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. मात्र बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांचे निधन शिवसैनिक सुन्न झाले आहेत.

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणात आलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांचा जीप चालक ते आमदार हा प्रवास वाखाणण्याजोगा होता. शिवसेनेमध्ये विविध पदांवर काम करत असताना 1995 आणि 1999 असे सलग दोन वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.

आमदार होण्याआधी बिनविरोध नगरसेवक होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. मिंध्यांनी गद्दारी केल्यानंतरही ज्ञानेश्वर पाटील हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यांच्या अकाली निधनामुळे परंडा मतदारसंघात शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;