पाच वर्षांपासून मुलीवर करत होता अत्याचार, बाप निघाला हैवान

पाच वर्षांपासून मुलीवर करत होता अत्याचार, बाप निघाला हैवान

स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱया नराधम बापाला गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने अटक केली. त्याला पुढील कारवाईकरिता ताडदेव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

महालक्ष्मी परिसरात राहणारी 17 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी ताडदेव पोलिसांत दिली. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-3 चे प्रभारी निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समीर मुजावर, उपनिरीक्षक राणे, गोरेगावकर, तसेच घाटकर, परब, जगताप, चव्हाण, ठापूर, हर्षला पाटील या पथकाने मुलीचा शोध सुरू केला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुलगी महालक्ष्मी रेल्वे स्थानकात असल्याचे कळताच पथकाने स्थानक गाठून मुलीला ताब्यात घेतले. तिला युनिट कार्यालयात नेऊन चौकशी केली असता तिने घर सोडून पळून गेल्याचे सांगितले. वडील गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक शोषण करत असल्याचे मुलीने सांगताच पोलिसांनी मुलीच्या बापाला पकडून ताडदेव पोलिसांच्या ताब्यात दिले.

मित्राने नकार दिल्याने परतली

वडिलांच्या लैंगिक अत्याचाराला वैतागून मी मित्रांकडे ठाण्याला गेली. पण त्याने सोबत राहायला नकार दिला. त्यामुळे पुन्हा महालक्ष्मीला आले असे मुलीने सांगितले. मुलीने वडील लैंगिक शोषण करतानाचा व्हिडीओ वडिलांच्या मोबाईलमध्ये गुपचूप चित्रित केला व तो व्यवस्थित लपवून ठेवला होता. तो व्हिडीओच समोर आल्याने मुलगी खरं बोलत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आणि नराधम बापाचे किळसवाणे कृत्य समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;