Mumbai News – हाजीअली दर्गा उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, हरियाणातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Mumbai News – हाजीअली दर्गा उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, हरियाणातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

हाजीअली दर्ग्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला हरियाणातून अटक केली आहे. पवन कुमार मिश्रा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिश्राला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आयपी अ‍ॅड्रेस ट्रेस करत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

आपण इंटरनेटवरून हाजीअली दर्ग्याच्या कार्यालयाचा नंबर मिळवला. मात्र आपण दारुच्या नशेत हा फेक कॉल केल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले. ताडदेव पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत.

आरोपीने 26 सप्टेंबर रोजी हाजीअली दर्ग्यातील कार्यालयात फोन करून बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. यानंतर हाजीअली दर्गा ट्रस्टीचे अधिकारी मोहम्मद ताहेर शेख यांनी ताडदेव पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस पथक, बॉम्ब स्कॉड यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ शोध सुरू केला. मात्र दर्ग्यात कोणताही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

ताडदेव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. यानंतर आरोपीचा आयपी अ‍ॅड्रेस ट्रेस करत पोलिसांनी गुरुग्राममधून त्याच्या मुसक्या आवळल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;