अटल सेतूवरून आणखी एकाची उडी, मानसिक तणावातून व्यावसायिकाने जीवन संपवले

अटल सेतूवरून आणखी एकाची उडी, मानसिक तणावातून व्यावसायिकाने जीवन संपवले

गेल्या काही दिवसात अटल सेतूवरून उडी घेत जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अटल सेतूवर कार उभी करत आणखी एकाने आपली जीवनयात्रा संपवली. फिलीप शहा असे मयत व्यक्तीचे नाव असून मानसिक तणावातून त्यांनी हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात करण्यात आली आहे.

माटुंगा येथील रहिवासी असलेले फिलीप शहा हे बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवर पोहचले. त्यांनी अटल सेतूवर आपली होंडा सिटी कार उभी केली, मग थेट समुद्रात उडी घेतली. शहा हे काही दिवसांपासून व्यावसायिक तणावात असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले.

अटल सेतूवर कार उभी करताच न्हावा शेवाचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी मुंबईतील कंट्रोल रुमला याबाबत माहिती दिली. त्यांनी समुद्रात गस्ती घालणाऱ्या पथकाला माहिती दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांनी शहा यांना बाहेर काढले.

शहा यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कारमध्ये आढललेल्या आधार कार्डवरून पोलिसांनी त्यांची ओळख पटवली. यानंतर शहा यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. नवी मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यास जात असल्याचे शहा यांच्या पत्नीने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;