गोविंदावर गोळी चुकून फायर झाली की कोणी झाडली? पोलिसांनी काय दिली माहिती

गोविंदावर गोळी चुकून फायर झाली की कोणी झाडली? पोलिसांनी काय दिली माहिती

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची प्रकृती आता ठीक आहे. मुलगी टीनाने वडिलांबाबत अपडेट दिली आहे. ती म्हणाली की, ते आता पूर्णपणे बरी आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा. दरम्यान, गोविंदाची भाची आरती सिंह पती दीपक चौहानसोबत हॉस्पिटलला पोहोचली होती. आरती सिंग बुधवारी दुपारी गोविंदावर उपचार होत असलेल्या रुग्णालयात पोहोचली होती. मुलगी टीनाने सांगितले की, आता तिचे वडील पूर्णपणे बरे आहेत. त्यांना आता सामान्य वॉर्डात हलवण्यात आले आहे. चाहत्यांना तिने त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत राहण्याची विनंती केली आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या बुलेट प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे. हा केवळ एक अपघात असल्याचे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी म्हटले आहे.. कोणत्याही षडयंत्र किंवा फसवणुकीची चर्चा नाही. मात्र, गोविंदाचे स्टेटमेंट अद्याप घेण्यात आलेले नाही. कारण तो रुग्णालयात दाखल आहे.

ज्या बंदुकीतून गोळी फायर झाली ती गोविंदाची स्वतःची परवाना असलेली रिव्हॉल्व्हर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासात हा केवळ अपघात असल्याचे आढळून आले, त्यामुळे अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी या घटनेची केवळ त्यांच्या डायरीत नोंद केली आहे.

गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा देखील शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचला. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी तो रुग्णालयात पोहोचला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना घडली तेव्हा यशवर्धन आई सुनीतासोबत कोलकात्यात होता.

रविना टंडनही हॉस्पिटलमध्ये पोहोचली

गोविंदासोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेली ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनही रुग्णालयात पोहोचली. अभिनेत्याला भेटल्यानंतर, तिने पापाराझीशी बोलणे टाळले. ताबडतोब तिच्या कारमधून निघून गेली. एक दिवस आधी डेव्हिड धवन आणि शत्रुघ्न सिन्हाही हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.

गोविंदाच्या व्यवस्थापकाने सांगितले की, अभिनेत्याला गरबा कार्यक्रमासाठी कोलकात्याला जायचे होते. त्यासाठी ते सकाळी साडेपाच वाजता तयार होत होते. पण यादरम्यान रिव्हॉल्वर तपासत असताना चुकून ती खाली सटकली आणि गोळी फायर झाली. जी त्यांच्या गुडघ्याच्या 2 इंच खाली घुसली. जखमी अवस्थेत त्यांनी त्यांच्या व्यवस्थापक आणि पत्नी सुनीता यांना फोन केला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;