Govinda Health Update: स्वतःच्या पायावर कधी उभा राहणार गोविंदा? कशी आहे अभिनेत्याची प्रकृती?

Govinda Health Update: स्वतःच्या पायावर कधी उभा राहणार गोविंदा? कशी आहे अभिनेत्याची प्रकृती?

Govinda Firing Incident: हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याच्या पायाला गोळी लागली आहे. स्वतःच्या रिव्हॉल्वरमधूल निघालेली गोळी अभिनेत्याच्या पायाला लागली आणि सर्वत्र खळबळ माजली. गोळी लागताच गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता अभिनेत्याच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पण गोविंदाचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

पायाला गोळी लागल्यानंतर अभिनेत्या गोविंदा याची प्रकृती कशी आहे? गोविंदा पुर्णपणे ठिक होण्यासाठी किती काळ लागेल? किती दिवस अभिनेत्याला बेड रेस्ट सांगितलं आहे? अशा अनेक प्रश्न चाहते आणि अभिनेत्याच्या कुटुंबियांना सतावत आहे. यावर डॉक्टरांनी मोठी अपडेट दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

गोविंदाला स्वतःच्या पायांवर उभं राहण्यासाठी किती काळ लागेल?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाच्या डाव्या बाजूला हाडाला दुखापत झाली आहे. अभिनेत्यची प्रकृती पूर्ववत होण्यासाठी आणखी 3 ते 4 आठवडे लागतील. गोविंदाच्या पायात गोळी काढण्यात आली असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली अभिनेत्याला ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अभिनेत्याला, 3 ते 4 आठवडे आराम करण्याची गरज आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

अभिनेत्याला चालायचं जरी असेल तरी गोविंदाला काही दिवस वॉकरचा आधार घ्यावा लागणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर आहे. पण काळजी घेण्याची गरज आहे. सांगायचं झालं तर, गोविंदाला गोळी लागल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. अनेक सेलिब्रिटी देखील त्यांच्या भेटीसाठी आहे. सोशल मीडियावर देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;