थिएटरमध्ये अरबाज खानला पत्नीने सर्वांसमोर केलं किस; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

थिएटरमध्ये अरबाज खानला पत्नीने सर्वांसमोर केलं किस; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

अभिनेता अरबाज खानची निर्मिती असलेल्या ‘बंदा सिंह चौधरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँच कार्यक्रमात त्याच्यासोबत त्याची पत्नी शुरा खानसुद्धा पोहोचली होती. एका थिएटरमध्ये या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी थिएटरमध्ये सर्वांसमोर शुराने अरबाजला किस केलं. त्याचा व्हिडीओ पापाराझींनी शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ दिसतंय की शुरा अरबाजला जवळ बोलावते आणि त्याच्या गालावर किस करते. यावेळी अरबाजच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकतं. त्यानंतर शुरा कॅमेराकडे पाहते. यावरूनच काहींनी तिला ट्रोल केलंय. ‘आता हिलासुद्धा ट्रिक समजली आहे की कॅमेरासमोर कसं वागायचं’, असं एकाने लिहिलंय. तर ‘तिलासुद्धा कळलंय की आपला व्हिडीओ शूट केला जाणार, म्हणून तिने मुद्दाम अरबाजला किस केलं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘या दोघांची जोडी आताही बापलेकीची जोडी वाटते’, असंही काहींनी लिहिलं आहे. ‘तिला माहितीये की तिचा व्हिडीओ काढला जातोय, म्हणून तिने अरबाजच्या गालावर किस केल्यानंतर पाहिलं की कॅमेऱ्यात ते कैद झालंय की नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी शुराला ट्रोल केलंय.

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

अरबाजने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला. बहीण अर्पिता खानच्या घरातच हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला होता. त्यामध्ये मोजके कुटुंबीय आणि बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. अरबाज आणि शुराला अनेकदा त्यांच्या वयातील अंतरावरून ट्रोल केलं गेलंय. इतकंच नव्हे तर शुरा ही अरबाजची पत्नी नव्हे तर मुलगी वाटते, असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले होते. ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर अरबाज आणि शुराची भेट झाली होती. शुरा ही अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीची मेकअप आर्टिस्ट आहे. शुराला भेटल्यापासून मी स्वत:विषयी अधिक आत्मविश्वासू झालोय, असं अरबाजने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;