अदानीच्या नावावरील दौलतीचे खरे मालक मोदी-शहा, त्यांच्यापासून महाराष्ट्राला धोका! – संजय राऊत

अदानीच्या नावावरील दौलतीचे खरे मालक मोदी-शहा, त्यांच्यापासून महाराष्ट्राला धोका! – संजय राऊत

लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने नाकारल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट गृहमंत्री अमित शहा यांनीच राज्यात तळ ठोकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही दौरे वाढले आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली असून मोदी-शहांपासून महाराष्ट्राला धोका असल्याचे म्हटले.

बुधवारी सकाळी माध्यमांनी मोदी-शहांच्या दौऱ्यांबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून महाराष्ट्राला धोका आहे. हा धोका काय आहे हे आपण गेल्या अडीच वर्षापासून पाहताय. मोदी-शहांना महाराष्ट्र, मराठी माणूस खतम करायचा आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी कणा मोडू काढायचा आहे.

महाराष्ट्राला मोदी-शहांपासून धोका आहे, ते वारंवार यासाठीच येताहेत की उरलासुरला स्वाभिमानही खतम करून महाराष्ट्र राज्य गुजरातला ताब्यात घ्यायचे आहे. हे लपून राहिलेले नाही. महाराष्ट्राची इंच न इंच जमीन, महाराष्ट्राच्या संस्था आणि उद्योग हे अदानींच्या घशात घातले जात आहे. ही संपत्ती जरी अदानींच्या नावावर असली तरी त्याचे खरे मालक मोदी-शहा हेच आहेत. महाराष्ट्रावरील हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आहे, असे संजय राऊत म्हणाले.

भाजपला स्वप्नदोष विकार जडलाय; 2024 ला 240 वर अडकले, 2029 ला 140 खाली जाणार! – संजय राऊत

दरम्यान, अमित शहा हे सह्याद्रीवर थांबलेले असून त्यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे ते बॉस आहेत. त्यांना भेटावेच लागेल, अन्यथआ ते नोकरीवरून काढून टाकतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;