‘प्रवाहाती’मधून भरतनाटय़म नर्तिका गीता चंद्रन यांचा पाच दशकांचा प्रवास उलगडणार 

‘प्रवाहाती’मधून भरतनाटय़म नर्तिका गीता चंद्रन यांचा पाच दशकांचा प्रवास उलगडणार 

प्रसिद्ध भरतनाटय़म नर्तिका ‘पद्मश्री’ गीता चंद्रन ‘प्रवाहाती’ हा नृत्याविष्कार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) येथे सादर करणार आहेत. या सादरीकरणातून चंद्रन यांचा भारतीय शास्त्रीय नृत्यातील 50 वर्षांचा थक्क करणारा प्रवास उलगडणार आहे. 1991 मध्ये स्थापन केलेल्या ‘नाटय़वृक्ष’ या सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून चंद्रन यांनी नर्तक आणि शिक्षक म्हणून भरतनाटय़मच्या सखोलतेचा शोध घेण्यासाठी अनेक दशके कष्ट घेतले. ‘प्रवाहाती’मधून भरतनाटय़म या प्राचीन कला प्रकाराला नवीन दृष्टिकोन मिळेल असा त्यांना विश्वास आहे. ‘प्रवाहाती’ वेळ आणि स्थळ या दोन्हींचा अस्थिर म्हणून शोध घेते, परंतु त्याचवेळी कल्पनाशक्ती आणि सादरीकरण या दोन्हींना पुढे नेते. याबद्दल गीता चंद्रन म्हणतात, ‘नृत्य हे जीवनाप्रमाणे, परंपरेपुरते मर्यादित राहू नये, तर कलाकाराच्या स्वभावानुसार त्याची पुनर्व्याख्या होऊन ते विकसित झालं पाहिजे.’ ‘मल्लारी’, ‘ऋतुसंहारा’, ‘वाहती’ आणि ‘तिल्लाना’ या चार उद्बोधक  सादरीकरणांमधून प्रवाहातीचे नृत्यदिग्दर्शन उलगडते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;