बिग बॉस होस्ट करण्यासाठी या दिग्गज मराठी अभिनेत्याला होती ऑफर, का दिला नकार?

बिग बॉस होस्ट करण्यासाठी या दिग्गज मराठी अभिनेत्याला होती ऑफर, का दिला नकार?

बिग बॉस मराठी आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस मराठीचा कालावधी कमी केल्याने आता हा शेवटचा आठवडा असणार आहे. या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर झाले होते. आता फायनलची रंगत वाढली आहे. बिग बॉसचं पाचवं पर्व कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून रितेश देशमुख दिसत नसल्याने तो कुठे गेला असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण तो विदेशात शुटिंगमध्ये असल्याने त्याच्या जागी निलेश साबळे तात्पुरत्या स्वरुपात होस्ट करत आहे. पण आता अशी ही बातमी समोर आली आहे की, बिग बॉस मराठी होस्ट करण्यासाठी रितेश देशमुखच्या आधी दिग्गज अभिनेत्याला विचारणा झाली होती.

तुम्हाला माहित असेल की पहिलं बिग बॉस मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केला होता. त्यानंतर तीन सीझन केल्यानंतर महेश मांजरेकर यांनी तब्येतीच्या कारणाने अभिनेते शिवाजी साटम यांना बिग बॉस मराठी शो होस्ट करण्याची ऑफर दिली होती. एका मुलाखतीत बोलताना शिवाजी साटम यांनी याबाबत माहिती दिली आहे. जेव्हा हिंदीत बिग बॉस सुरू झालं ते मी पाहिलं. पण नंतर जेव्हा मराठीत बिग बॉस सुरु झाले तेव्हा फक्त महेश मांजरेकरला पाहण्यासाठी मी ते पाहिलं होतं. पण आपल्या खाजगी आयुष्यात कोणीतरी डोकावतंय हे याने लोकांना आनंद मिळत असेल पण मला नाही. माझा तो स्वभाव नाही. त्यामुळे मी ते बघत ही नाही. समोर आलं तरी लगेल पुढे ढकलतो.

‘महेशची तब्येत ठीक नसल्याने मला हा शो एक आठवडा होस्ट करण्यासाठी विचारणा झाली होती. तेव्हा मी त्याला नकार दिला होता. कारण मी ते करू शकणार नाही. महेश इतकं छान करतो.  त्याच्या पद्धतीने तो करायचा ते होस्टिंग मला आवडायचं. तो स्टेजवर गंमतीही करायचा. पण मला वैयक्तिकरित्या हा शो एवढा एक्सायटिंग वाटत नाही. शो चांगला नाही असं मी म्हणत नाही पण मला ती करायची इच्छा नाही. म्हणून मी ऑफर नाकारली’ असं शिवाजी साटम यांनी सांगितलं.

बिग बॉस मराठीच्या अंतिम आठड्यात अभिजित सावंत, निक्की तांबोळी, वर्षा उसगावंकर, अंकिला वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सुरज चव्हाण धनंजय पवार पोहोचले आहे. त्यामुळे यांच्यात स्पर्धा रंगणार आहे. ६ ऑक्टोबरला फिनाले रंगणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;