कर्दे गावाला मिळालेल्या कृषी पर्यटन पुरस्काराचा कोकण कृषी विदयापिठाला अभिमान- कुलगुरू डॉ. संजय भावे

कर्दे गावाला मिळालेल्या कृषी पर्यटन पुरस्काराचा कोकण कृषी विदयापिठाला अभिमान-  कुलगुरू डॉ. संजय भावे

कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले सचिन तोडणकर हे दापोली येथील कर्दे ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवित आहेत. त्यांनी आपल्या पदाची गरीमा राखत पदाला साजेसे काम करून विविध प्रकारच्या सन्मानाचे पुरस्कार गावाला मिळवून दिले आहेत. देश पातळीवर कर्दे गावाला कृषी पर्यटनाचा मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा या गावाची महती सांगणारा असा महत्वाचा पुरस्कार आहे. कर्दे ग्रामपंचायतीचे सरपंच असलेले सचिन तोडणकर हे कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आसल्याचा विद्यापिठाला सार्थ अभिमान असल्याची भावना कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय भावे यांनी व्यक्त केली.

केंद्राचा सर्वोकृष्ट कृषी पर्यटन पुरस्कार कर्दे ग्रामपंचायतीला मिळाला. मिळालेल्या संधीचे सोनं करत सचिन तोडणकर यांनी आपले कल्पक नेतृत्व पणाला लावून मिळविलेल्या या महत्त्वाच्या पुरस्काराचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाकडून कृषी विद्यापीठात सरपंच सचिन तोडणकर यांचा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला.

सचिन तोडणकर हे विद्यार्थी दशेत असल्यापासून नम्र, हुशार विद्यार्थी होते. हॉटेल व्यवसाय सांभाळत कर्दे गावचे सरपंच पद सांभाळलीत ग्रामविकासाचा कर्दे पॅटर्न त्यांनी तयार केला. सामाजिक क्षेत्रात त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन कर्दे  गावाचा कायापालट केला. या कामाची दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील कर्दे गावाला सर्वोत्कृष्ट ग्रामीण कृषि पर्यटन गाव पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार  सचिन तोडणकर यांनी सर्जनतेने आणि प्रयोगशिलतेने केलेल्या कामाची पोहोचपावती आहे. यासाठी  सचिन आपला आम्हां कृषी विद्यापीठ परिवाराला सार्थ अभिमान आहे . असे गौरवोद्रद्वार विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी काढले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;