‘नवरा माझा नवसाचा 2’ची तगडी कमाई; जमवला इतक्या कोटींचा गल्ला
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा 2' हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई चांगली होत आहे. 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.
या दुसऱ्या भागात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, संतोष पवार, हरिश दुधाडे,गणेश पवार अशी दमदार स्टारकास्ट पहायला मिळतेय.
'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाने आतापर्यंत 18.57 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 14.36 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाची कमाई 4.21 कोटी रुपयांची झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List