गोविंदाला गोळी लागली तेव्हा त्याची पत्नी कुठे होती?; रुग्णालयात कोण घेतंय काळजी?

गोविंदाला गोळी लागली तेव्हा त्याची पत्नी कुठे होती?; रुग्णालयात कोण घेतंय काळजी?

अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदाच्या गुडघ्याला गोळी लागल्यानंतर त्याला अंधेरीतल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोविंदाच्या स्वत:च्याच रिव्हॉल्वरमधून ही गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली. आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी गोविंदाची रिव्हॉल्वर जप्त केली असून याप्रकरणी ते पुढील तपास करत आहेत. गोविंदा कोलकातासाठी घरातून निघत होता, तेव्हा ही घटना घडली. यावेळी घरात त्याची पत्नी सुनितासुद्धा उपस्थित नव्हती. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सुनिताने सांगितलं, “डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदाची प्रकृती आता स्थिर आहे. मी सध्या मुंबईबाहेर आहे. याबद्दलची माहिती मिळताच मी इथून निघाले आहे. इथून थेट मी रुग्णालयात जाणार आहे.” गोविंदाचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकसुद्धा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. मामाला गोळी लागल्याची माहिती मिळताच कृष्णाने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने याविषयी माहिती देताना सांगितलं, “गोविंदाच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नाही. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. तो कोलकाताला जायला घरातून निघाला होता, तेव्हा ही घटना घडली. गोविंदा त्याची परवानाकृत रिव्हॉल्वर कपाटात ठेवत होता, त्याचवेळी ती चुकून खाली पडली आणि त्यातून सुटलेली गोळी गोविंदाच्या डाव्या पायाला गुडघ्याच्या खाली लागली. डॉक्टरांनी पायातून गोळी काढली आहे. सध्या रुग्णालयात गोविंदासोबत त्याची मुलगी टीना आहे. गोविंदा सर्वांशी बोलत असून त्याची प्रकृती स्थिर आहे.”

गोविंदाची मुलगी टीना अहुजा ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाली, “सध्या बाबा आयसीयूमध्ये आहेत. मी त्यांच्यासोबत आहे. मी फारसं काही बोलू शकत नाही. पण बाबांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या असून रिपोर्ट्स ठीक आहेत. बाबांना किमान पुढील 24 तास आयसीयूमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीवरून त्यांना आयसीयूमध्ये ठेवायचं की नाही ते डॉक्टर ठरवतील. त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी करण्याचं कारण नाही.”

या घटनेनंतर गोविंदाने अद्याप कोणती पोलीस तक्रार नोंदवली नाही. मात्र लवकरच त्याच्या कुटुंबीयांकडून घटनेविषयीची सविस्तर माहिती देण्यात येईल, असं कळतंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;