बंदुकीतून चुकून गोळी सुटली अन् पायाला लागली; अभिनेता गोविंदा जखमी, रुग्णालयात दाखल

बंदुकीतून चुकून गोळी सुटली अन् पायाला लागली; अभिनेता गोविंदा जखमी, रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेता गोविंदा स्वत:चीच रिवॉल्वर साफ करताना चुकून गोळी सुटल्याने जखमी झाला आहे. गोविंदाच्या पायात गोळी शिरली असून त्याला उपचारासाठी मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी गोविंदा आपली सर्व्हिस रिवॉल्वर साफ करत असताना चुकून मिसफायर झाले. रिवॉल्वहरमधून सुटलेली गोळी थेट गोविंदाच्या पायात शिरली. त्यानंतर त्याला तातडीने क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोविंदावर सध्या उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे 4.45 वाजताच्या सुमारास घडली. बाहेर जाण्याची तयारी करत असताना गोविंदा आपली सर्व्हिस रिवॉल्वर साफ करत होता. याच दरम्यान चुकून त्याच्याकडून गोळी चालली गेली. चुकून सुटलेली गोळी त्याच्या गुडघ्याजवळ लागली असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;