लाडका पॅडीदादा घरातून बाहेर जाताच सूरजची भावनिक पोस्ट; नेटकरी म्हणाले, रक्तापलिकडचं नातं…

लाडका पॅडीदादा घरातून बाहेर जाताच सूरजची भावनिक पोस्ट; नेटकरी म्हणाले, रक्तापलिकडचं नातं…

‘बिग बॉस मराठी’चा फिनाले जवळ आला आहे. येत्या रविवारी म्हणजेच 6 ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले होणार आहे. त्याआधी या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे याने ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतला. पॅडी घरातून बाहेर जाणार असल्याचं कळताच सूरज भावनिक झाला. सूरज आणि पॅडीने घट्ट मिठी मारली. सूरजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यातून दोघांच्या नात्यातील ओलावा दिसतोय. नेटकऱ्यांनी या व्हीडिओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. रक्तापलिकडचं नातं असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

एक नातं रक्तापलिकडच…, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. पॅडीदादा तुम्ही सुरजला साथ देऊन ट्रॉफी तर नाही पण अखंड महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत. पॅडी ट्रॉफी न जिंकता.. सगळं काही जिकूंन आला…, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. बिगबॉस ची ट्रॉफी नाही जिंकली. पण सूरजला आधार देऊन जनतेची मनं जिंकली. सोन्या चांदीचं काय करायचं जेव्हा हिऱ्यासारखा मित्र सूरजसोबत होता, अशीही कमेंट या व्हीडिओवर पाहायला मिळत आहे.

पॅडी ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर

‘बिग बॉस मराठी’ चा खेळ अंतिम टप्प्यात आलेला आहे. असं असतानाच ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्वच सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होते. निक्की, सूरज या दोघांना कालच्या भागात सेफ करण्यात आलं. या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं. अंकिता-पॅडी या दोघांमध्ये शेवटपर्यंत अटीतटीची लढत झाली. शेवटच्या क्षणी अंकिताला सेफ झाली. पंढरीनाथ कांबळेला या आठवड्यात घराचा निरोप घ्यावा लागला.

पॅडी आणि सूरजचं अनोखं नातं

पॅडी आणि सूरज यांचं नातं खास होतं. पॅडी कायम सूरजच्या पाठिशी उभा असायचा. गार्डन एरियात बसले असताना पॅडीने सूरजची शिकवणी घेतली होती. जेव्हा तुला वाचायला येईल. तेव्हा जे हातात मिळेल. मग तो पेपर असो या पुस्तक सगळे वाच…. जे तू वाचतोय. त्याच्या अर्थ समजून घ्यायचा आणि मग वाचायचं. शब्द समजून घ्यायचा प्रयत्न कर, असा सल्ला पॅडीने दिला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;