IIFA 2024: ‘ऊ अंटवा’ गाण्यावर थिरकले शाहरूख खान-विकी कौशल, भन्नाट डान्स पाहून…
अबुधाबीमध्ये सध्या सेलिब्रिटींचा जल्लोष सुरु आहे. आयफा अवॉर्ड्स 2024 चा भव्य कार्यक्रम सुरू असून सर्वांच्या नजरा फक्त या मोठ्या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत. यावर्षी बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान हा कार्यक्रम होसट करत असून, त्यामुळे सर्वच जण उत्साहित आहेत. रेड कार्पेटवरही मोठमोठे स्टार दिसले. त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सगळीकडे फक्त याच इव्हेंटची चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम होस्ट करणाऱ्या शाहरुखने यंग अभिनेता विकी कौशल सोबत केलेला डान्सही चर्चेचा विषय ठरला आहे . त्या दोघांच्या केमिस्ट्रीची सध्या खूप चर्चा सुरू आहे. सर्वांनीच शाहरुख-विकीच्या या परफॉर्मन्सला भरभरून दादही दिली.
‘ऊ अंटवा’ गाण्यावर थिरकले शाहरूख-विकी कौशल
पुष्पा 2 : द रूल या चित्रपटाची क्रेझ सध्या प्रचंड वाढली आहे. या चित्रपटाचा थ्रिलिंग टीझर आणि गाणी देखील रिलीज झाली असून सर्वांनाचा हा चित्रपट पाहण्याची खूप उत्सुकता लागली आहे. हा ‘पुष्पा’ या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल असून सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. आयफा अवॉर्डस 2024 मध्ये या चित्रपटाची बरीच क्रेझ होती. फक्त चाहतेच नव्हे तर सेलिब्रिटीही या पुष्पा चित्रपटातील गाण्याचे फॅन झाले असून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि सध्याच्या जनरेशनमधील अव्वल अभिनेता विकी कौशलही या चित्रपटाचे फॅन आहेत.
आयफाच्या स्टेजवर चक्क शाहरुख आणि विकी हे दोघे ‘पुष्पा’ चित्रपटातील गाजलेल्या ‘ऊ अंटवा’ या गाण्यावर थिरकले. त्या दोघांनी या गाण्यातील सिग्नेचर स्टेप केली. ‘ऊ अंटवा’ गाण्यात समंथा आणि अल्लू अर्जुन जसे नाचले, तशीच सेम टू सेम स्टेप शाहरुख-विकीने केली. त्यांचा हा परफॉर्मन्स पाहून उपस्थित सेलिब्रिटीही अवाक् झाले, त्यांचे चाहते बनले. दोघांच्याही या डान्सला सर्वांनी भरभरून दाद दिली. विशेष म्हणजे या चित्रपटातील गाण्याातील अभिनेत्री समंथा देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होती. पुष्प 2 हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
आयफा अवॉर्डसाठी ताऱ्यांची मंदियाळी
आयफा अवॉर्ड सोहळ्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, अनन्या पांडे, विकी कौशल, क्रिती सेनन यांच्यासह अनेक स्टार्सनी उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला. वयाच्या 69 व्या वर्षीही रेखाचे सौंदर्य आणि नृत्य पाहण्यासारखे आहे. सर्वत्र रेखा यांच्या डान्सची चर्चा रंगली. रेखा यांनी 90 च्या दशकातील गाण्यांवर डान्स केला. त्यांच्या परफॉर्मन्सलाही उपस्थितांची दाद मिळाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List