चिठ्ठी लिहीत स्वत:शी लग्न करणाऱ्या टिकटॉक स्टार तरुणीने जीवन संपवलं

चिठ्ठी लिहीत स्वत:शी लग्न करणाऱ्या टिकटॉक स्टार तरुणीने जीवन संपवलं

स्वत:शी लग्न करणाऱ्या तुर्कीच्या प्रसिद्ध टिकटॉक स्टार कुबरा आयकुटने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन तिने आपले जीवन संपवले आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तिच्या आत्महत्येने चाहत्यांना धक्का बसला आहे.

तुर्की माध्यमांच्या माहितीनुसार, इंस्ताबुलच्या सुल्तानबेली जिल्ह्यामध्ये कुबरा आयकुट चा मृतदेह सापडला आहे. पोलिसांना मृतदेहाशेजारी एक सुसाइड नोटही सापडली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

कुबरा आयकुट (26)ला 2023 मध्ये सोशल मीडियावर ‘वेडिंग विदाऊट अ ग्रूम’ या व्हायरल व्हिडिओमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. या व्हिडिओमध्ये कुबराने स्वतःशी लग्न केले होते. कुबराच्या म्हणण्यानुसार, तिला योग्य वर सापडला नाही. त्यामुळे तिला स्वतःशीच लग्न करावे लागले. आता तिच्या आत्महत्येच्या बातमीने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तिच्या शेवटच्या TikTok व्हिडिओमध्ये ती तिचे अपार्टमेंटची सफाई करताना दिसत आहे.

तुर्की टुडेच्या वृत्तानुसार, कुबराने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, एका चांगल्या व्यक्तीप्रमाणे जगून मला काहीच मिळाले नाही. जीवनात स्वार्थी व्हा, तरच तुम्हाला आनंद मिळेल. मी अनेक दिवसांपासून संघर्ष करत आहे. मात्र कोणीही लक्ष दिले नाही. माझे स्वतःवर प्रेम आहे, म्हणून मी जग सोडून जात आहे. मी माझ्या स्वेच्छेने उडी घेतली आहे. मला आता आणखी जगायचे नाही. मी माझ्या आयुष्यात सर्वांशी चांगली होते. मात्र मी स्वतःसाठी चांगली होऊ शकले नाही. फिस्टिकची चांगली काळजी घ्या. मला माफ करा असे तिने लिहीले आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;