सातारा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट बनतेय!

सातारा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट बनतेय!

अनुकूल वातावरण व जमिनीची सुपीकता, विभागानुसार 300 ते 5 हजार मिलिमीटरपर्यंत पडणारा पाऊस, अशा वातावरणामुळे जिह्यात सुमारे 7 हजार हेक्टरवर तब्बल 40 प्रकारची फळे घेण्यात येत आहेत. जिह्यातून द्राक्ष, डाळिंबाची अनेक देशांत निर्यात होते. यामुळे सातारा जिल्हा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट म्हणून पुढे येत आहे.

महाबळेश्वर, कोयनानगर येथे जून ते सप्टेंबरदरम्यान 5 हजार मिलिमीटरच्याकर पर्जन्यमान होते. जिह्यात अशी भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे विविध भागांत वेगवेगळी पिके घेण्यात येतात तसेच फळबागाही घेतल्या जातात. सध्या जिह्यात 40 प्रकारची फळे घेण्यात येतात. जिह्यात सर्वाधिक क्षेत्र डाळिंबाचे आहे. त्यानंतर इतर फळे घेण्यात येतात. यातील काही फळे कमी पाऊस पडणाऱया भागात होतात, तर काही फळांना पाऊस तसेच हवामान आवश्यक असते. या फळबागातून शेतकरी मालामाल होऊ लागले आहेत. यातूनच महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी पर्यटन सुरू झाले, तर दुष्काळी भागात कृषी पर्यटनाला गती मिळाली आहे. बळीराजासाठी हे आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी इकडे वळत आहेत.

जिह्यातील फळ लागकड अन् क्षेत्र (हेक्टरमध्ये) द्राक्ष – 618, डाळिंब 1,400, आंबा 1,486, काजू – 14, सीताफळ – 690, पेरू – 450, कागदी लिंबू – 68, चिकू – 227, नारळ – 151, बोर – 26, आवळा 42, जांभूळ – 26, फणस 20, चिंच 82, अंजीर 19, संत्री – 02, मोसंबी – 04, सफरचंद – 03, केळी – 275, पपई – 55, ड्रगनफ्रूट – 70, स्ट्रॉबेरी – 1,037, कलिंगड – 81, टरबूज – 18, रासबेरी – 10, गुजबेरी – 10, ब्लूबेरी – 01, मलबेरी – 22, खजूर – 02.

फळबागांचे होणारे फायदे

n फळपिकात आंतरपीक घेता येते, कमी पाण्यातही फळबागा घेणे शक्य होते, शाश्वत उत्पन्नाचा पर्याय निर्माण, पर्यटनाच्या माध्यमातून अर्थार्जन होऊ शकते, रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत, दुष्काळी तालुक्यात पर्यटन, एकाच ठिकाणी अनेक फळबागा, पर्यटन व्यवसायातून फळांची विक्री, फळांवर प्रक्रिया उद्योग झाल्यास रोजगार काढणार.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;