Arbaaz Khan: ‘प्रथा आणि परंपरा…’, कोणता धर्म मानतो अरबाज खान?

Arbaaz Khan: ‘प्रथा आणि परंपरा…’, कोणता धर्म मानतो अरबाज खान?

अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. सोशल मीडियावर अरबाज याच्याबद्दल अनेक गोष्टी देखील चर्चेत असतात. सांगायचं झालं तर, अरबाज याचे वडील सलीन खान मुस्लिम आहेत आणि त्याची आई सलमा खान या हिंदू आहेत. त्यामुळे एका मुलाखतीत अरबाज खान याला त्याच्या धर्माबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा अरबाज याने धर्माबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं होतं.

अरबाज खान म्हणाला होता, ‘देवावर माझी श्रद्धा आहे पण मी धर्मिक नाही. कारण प्रत्येक धर्म एकच गोष्ट सांगते आणि ती म्हणजे उत्तम वागणूक… मी कधीच मशीद, मंदिर, चर्चा किंवा गुरुद्वारामध्ये जात नाही. कारण लोकं धर्मिक स्थळी फक्त दैवी शक्ती अनुभवण्यासाठी जात असतात.’

‘मी कधीच प्रथा, परंपरा आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. माझ्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी आभारी आहे. त्यामुळे मला धर्मिक स्थळी जाण्याची गरज वाटत नाही.’ असं देखील अरबाज खान म्हणाला होता. शिवाय अभिनेत्याने वडिलांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.

वडील सलीम खान यांच्याबद्दल अरबाज म्हणाला, ‘मी माझ्या वडिलांना माझा मार्गदर्शक आणि गुरू समजतो. त्यांच्याकडून मी नवीन गोष्टी शिकत असतो आणि त्या अमलात आणण्याचा प्रयत्न करत असतो…’ अनेक ठिकाणी अभिनेत्याला वडिलांसोबत स्पॉट देखील केलं जातं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

 

अरबाज खान याचं खासगी आयुष्य

अभिनेता अरबाज खान याचं पहिलं लग्न अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत झालं होतं. मलायका आणि अरबाज यांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली.

अरबाज खान याचं दुसरं लग्न

मलायका हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं. वयाच्या 56 व्या वर्षी अरबाज याने दुसरं लग्न केलं. फार कमी लोकांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न पार पडलं. लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;