Khatron Ke Khiladi 14 चा विजेता ठरला करणवीर, ट्रॉफीसह मिळाली मोठी रक्कम आणि आलिशान कार

Khatron Ke Khiladi 14 चा विजेता ठरला करणवीर, ट्रॉफीसह मिळाली मोठी रक्कम आणि आलिशान कार

Khatron Ke Khiladi 14: ‘खतरों के खिलाडी 14’ शोला अखेर विजेता मिळला आहे. अभिनेता करणवीर मेहरा याने ‘खतरों के खिलाडी 14’ शो स्वतःच्या नावावर केला आहे. अभिनेता गश्मीर महाजनी आणि कृष्णा श्रॉफ हिला मागे टाकत करणवीर याने बाजी मारली आहे. ‘खतरों के खिलाडी 14’ शोची ट्रॉफी जिंकल्यानंतर करणवीर याला चमकती ट्रॉफी, आलिशान कार आणि 20 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘खतरों के खिलाडी 14’ शोचा विजेता करणवीर याची चर्चा होत आहे. विजेता म्हणून घोषित झाल्यानंतर अभिनेत्याने मनातील भावना देखील व्यक्त केल्या आहेत.

‘खतरों के खिलाडी 14’ शो जिंकल्यानंतर भावना व्यक्त करत करणवीर म्हणाला, ‘मी जिंकलो आहे यावर अद्यापही विश्वास बसत नाहीये. सतत मुलाखती देत असल्यामुळे मला आनंद होत आहे. असं वाटत आहे की मला ISI मार्क मिळाला आहे.’ असं अभिनेता म्हणाला.

पुढे अभिनेत्याला विचारण्यात आलं की, ‘खतरों के खिलाडी 14’ शो तू जिंकशील याची तुला कल्पना होती का? यावर करणवीर म्हणाला, ‘मनात एक भावना होती की, मी शो जिंकेल. प्रत्येकाच्या मनात जिंकण्याची भावना होती. पण जेव्हा माझ्या नावाची घोषणा करण्यात आली. तेव्हा मी सुन्न झालो. मला काहीच कळत नव्हतं माझ्या आजू-बाजूला काय घडत आहे…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by KaranVeerMehra (@karanveermehra)

 

करणवीर पुढे म्हणाला, ‘सर्वकाही स्लो मोशनमध्ये सुरु होतं. मी सुन्न झालो होतो. मी जवळपास बेशुद्ध होणार होतो. जेव्हा रोहित शेट्टी यांनी माझ्या नावाची घोषणा केली तेव्ही विजेता बेशुद्ध झालाय ऐकायल चांगलं वाटलं नसतं..’ असं अभिनेता विनोदी अंदाजात म्हणाला.

पुढे येणाऱ्या संधींबद्दल अभिनेता म्हणाला, ‘मला लवकरच कळेल की, ही ट्रॉफी माझ्यासाठी अनेक नव्या गोष्टी घेवून येईल. आता नव्या संधी मिळत आहेत. त्यामुळे योग्य पर्यायाची निवड करता आली पाहिजे. वेग-वेगळ्या भूमिका मी साकारू शकतो आणि मानधनात देखील थोडीफार वाढ होईल…’ असं देखील अभिनेता म्हणाला. आता करणवीर मेहरा ‘बिग बॉस 18’ मध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण यावर अभिनेत्याने अधिकृत वक्तव्य केलं नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;