आर्यन खान ड्रग्स केसवर पहिल्यांदा शाहरुख खानने सोडलं मौन; म्हणाला, ‘वाईट काळात आम्ही…’

आर्यन खान ड्रग्स केसवर पहिल्यांदा शाहरुख खानने सोडलं मौन; म्हणाला, ‘वाईट काळात आम्ही…’

Shah Rukh Khan on Aryan Khan Case: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान सध्या ‘आयफा अवॉर्ड 2024’ मुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा शाहरुख खान आणि त्याचं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. 2021 मध्ये शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान याचा ड्रग्स केस प्रकरणार अटक करण्यात आली होती. पूर्ण एक महिना आर्यन तुरुंगात होता. आर्यन खान कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. यावर शाहरुख खान कधीच काहीही बोलला नव्हता.

पण नुकताच झालेल्या ‘आयफा अवॉर्ड 2024’ मध्ये अभिनेत्याने आर्यन खान याच्या ड्रग्स केसबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, जेव्हा किंग खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आलं तेव्हा त्याने मनातील भावना व्यक्त केल्या. सध्या शाहरुख खान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होत आहे.

 

 

‘जवान’ सिनेमासाठी पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करत शाहरुख खान म्हणाला, ‘मी फार क्वचित माझ्या खासगी आयुष्यावर बोलत असतो. पण हा (जवान) सिनेमा माझ्यासाठी खास आहे. जेव्हा सिनेमाची शुटिंग सुरु होती. तेव्हा आम्ही वाईट गोष्टींचा सामना करत होतो…’ असं म्हणत शाहरुख खान याने नाव न घेता आर्यन खान केसवर वक्तव्य केलं.

दरम्यान, शाहरुख खान याने जवळच्या व्यक्तींचे आभार देखील मानले. पत्नी गौरी खान, मॅनेजर पूजा ददलानी आणि ‘जवान’ सिनेमाच्या पूर्ण टिमचे अभिनेत्याने आभार मानले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहते देखील लाईक्स कमेंट करत प्रेम व्यक्त करत आहेत.

आर्यन खान ड्रग्स केस

NCB ने 2021 मध्ये क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. यामध्ये शाहरुख खान याचा मुलगा आर्यनही ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर जवळपास 1 महिना आर्यन तुरुंगात होता. अखेर आर्यनला मे 2023 मध्ये या प्रकरणात क्लीन चिट मिळाली.

तीन सिनेमांमध्ये शाहरुख खान याने मारली बाजी

2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी फार खास ठरलं. ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्याने चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘जवान’ सिनेमा प्रदर्शित झाला. ‘जवान’ सिनेमाने देखील जगभरात नवे विक्रम रचले. त्यानंतर किंग खान ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;