मोदींना सत्तेतून हटवेपर्यंत मी काही मरत नाही! तब्येत बरी नसतानाही खरगेंचे कश्मीरात तडाखेबंद भाषण

मोदींना सत्तेतून हटवेपर्यंत मी काही मरत नाही! तब्येत बरी नसतानाही खरगेंचे कश्मीरात तडाखेबंद भाषण

जम्मू-कश्मीरमधील कठुआ जिह्यात एका सभेत भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावरच बेशुद्ध पडले. बरे वाटल्यानंतर खरगे पुन्हा व्यासपीठावर आले आणि त्यांनी तडाखेबंद भाषण केले. ‘मी 83 वर्षांचा आहे, पण इतक्या लवकर मरणार नाही. जोपर्यंत मोदींना हटवत नाही तोपर्यंत जिवंत राहीन, असे सांगत त्यांनी मोदी आणि भाजपवर हल्ला केला.

कठुआ येथे प्राण गमावलेल्या हवालदाराला श्रद्धांजली अर्पण करतानाच त्यांची तब्येत खालावली होती. भाषण करताना खरगे यांचा आवाज क्षीण झाला आणि ते अचानक बेशुद्ध झाले. त्यामुळे गर्दीत गोंधळ उडाला. व्यासपीठावर उभ्या असलेल्या पदाधिकारी आणि अंगरक्षकांनी त्यांना आधार देऊन बसवले.  बरे वाटल्यानंतर पुन्हा उभे राहून त्यांनी भाषण केले. जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ही मागणी लावून धरेन, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी फोन करून खरगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

भाजपला जम्मू-कश्मीरात कधीही निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांना हवे असते तर एक-दोन वर्षांत निवडणुका घेता आल्या असत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांना नायब राज्यपालांच्या माध्यमातून रिमोट-नियंत्रित सरकार चालवायचे होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;