शिवसेनेच्या दणक्याने अदानी व्यवस्थापनाला जाग, विमानतळ हेल्पडेस्कच्या ठिकाणी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य उल्लेख

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी मनमानी कारभार करणाऱया अदानी व्यवस्थापनाला शिवसेनेच्या दणक्याने अखेर जाग आली. महाराष्ट्र वाहतूक सेनेने जाब विचारताच विमानतळ हेल्पडेस्कच्या ठिकाणी दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य उल्लेख करत अदानी व्यवस्थापनाने आपली चूक सुधारली.

मुंबई विमानतळाच्या  हेल्पडेस्कवर एकदम तळाशी ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा उल्लेख करण्यात आला होता. हा प्रकार म्हणजे शिवाजी महाराजांचा अवमान आहे. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही.  हेल्पडेस्कच्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करताना झालेली चूक सुधारण्यात यावी, अशी ताकीद महाराष्ट्र वाहतूक सेनेने अदानी व्यवस्थापनाला दिली होती.

महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, सरचिटणीस सूर्यकांत तांडेल, कार्याध्यक्ष अशोक टाव्हरे, उपाध्यक्ष प्रमोद सावंत, साईकुमार माळोदे, नारायण पवार, चिटणीस धर्मेश राठोड व इतर पदाधिकारी यांनी अदानी व्यवस्थापनाला यासंदर्भात जाब विचारला. याची गंभीर दखल घेत  अदानी व्यवस्थापनानाने विमानतळ  हेल्पडेस्कच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख योग्य पद्धतीने करत चूक सुधारली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;