Ratnagiri News – गणपतीपुळे समुद्रात पोहायला गेलेले दोघे बुडाले, मयत JSW कंपनीचे कर्मचारी

Ratnagiri News – गणपतीपुळे समुद्रात पोहायला गेलेले दोघे बुडाले, मयत JSW कंपनीचे कर्मचारी

गणपतीपुळे येथील समुद्रात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रत्नागिरीत घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. दोघांची अद्याप ओळख पटली नाही. पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

JSW कंपनीचे तिघे कर्मचारी रविवारी गणपतीपुळे येथे फिरायला गेले होते. यापैकी दोघे जण समुद्रात पोहायला गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडू लागले.

समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ पाण्यात उडी घेत दोघांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र जीवरक्षक त्यांच्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;