घटस्फोटानंतर परत प्रेमात पडला हनी सिंह?, गर्लफ्रेंडच्या हातामध्ये हात टाकून…

घटस्फोटानंतर परत प्रेमात पडला हनी सिंह?, गर्लफ्रेंडच्या हातामध्ये हात टाकून…

हनी सिंह हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हनी सिंहची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही वर्षानंतर हनी सिंह याने धमाकेदार पद्धतीने पुनरागमन केलंय. नशेमध्ये आपल्या आयुष्यातील काही महत्वाची वर्ष खराब झाल्याचे हनीने म्हटले. हेच नाही तर मागील काही दिवसांमध्ये आपण पूर्णपणे नशेत होतो. आपल्यासोबत काय सुरू आहे आणि बाहेर काय घडत आहे हे देखील आपल्याला माहिती नसल्याचे हनी सिंहने मान्य केले. फक्त हेच नाही तर हनी सिंह म्हणाला होता की, दिवस कधी व्हायचा आणि रात्र कधी हेच मला कळत नव्हते. मी नशेत पूर्णपणे गेलो होतो.

नशेपासून दूर राहण्यासाठी आणि त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपण खूप जास्त मेहनत घेतल्याचेही हनी सिंह याने म्हटले. आता नुकताच हनी सिंह हा IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये पोहोचला. यावेळी तो एका सुंदर मुलीसोबत दाखल झाला. दोघांनीही एकमेकांच्या हातामध्ये हात दिल्याचे बघायला मिळाले. फोटोसाठीही एकत्र पोझ दिल्या.

फोटोसाठी पोझ देत असताना काहीतरी एकमेकांना बोलताना देखील ती मुलगी आणि हनी सिंह हे दिसले. हनी सिंह आणि त्या मुलीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडताना दिसत आहे. ही मुलगी हनी सिंह याची नवीन गर्लफ्रेंड असल्याचेही सांगितले जातंय. दोघांचे आता अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

2011 मध्ये हनी सिंह याने शालिनी तलवार हिच्यासोबत लग्न केले. शालिनी तलवार हिने अत्यंत गंभीर आरोप हे हनी सिंह याच्यावर केले. शेवटी दोघांचा घटस्फोट झाला. हेच नाही तर शालिनी तलवार हिच्यासोबत घटस्फोट घेणे हनीसाठी सोपे नव्हते. खूप मोठी तगडी रक्कम हनी सिंह याला शालिनी तलवार हिला द्यावी लागली.

शालिनी तलवार हिच्यानंतर टीना थडानी ही हनी सिंह याच्या आयुष्यात आली. टीना थडानी आणि हनी सिंह हे एक वर्ष एकमेकांसोबत रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर यांच्या ब्रेकअपची चर्चा ही सुरू झाली. आता या नवीन मुलीच्या प्रेमात हनी असल्याचे सांगितले जातंय. ही मुलगी मोरक्कन मॉडेल असल्याचे सांगितवे जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;