श्वेता तिवारी खोटी, विक्टिम कार्ड खेळते आणि…, अभिनेत्रीबद्दल ‘हा’ पुरुष असं का म्हणाला?

श्वेता तिवारी खोटी, विक्टिम कार्ड खेळते आणि…, अभिनेत्रीबद्दल ‘हा’ पुरुष असं का म्हणाला?

Shweta Tiwari: अभिनेत्री श्वेता तिवारी हिने झगमगत्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. श्वेता तिवारी हिने पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर दुसरं लग्न केलं. अभिनेत्रीचं दुसरं लग्न देखील अपयशी ठरलं. श्वेता हिने दुसऱ्या पतीवर देखील घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती. श्वेता हिने गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेत्री दुसरा पती अभिनव कोहली यांने देखील श्वेतावर आरोप केले.

श्वेता तिवरी हिच्या दुसऱ्या पतीने अभिनेत्रीवर खोटी आणि विक्टिम कार्ड खेळत असल्याचे आरोप लावले होते. शिवाय मुलाला भेटू देत असल्याचे आरोप देखील अभिनव याने केले होते. ज्यासाठी अभिनवने कायद्याची मदत घेतली होती. श्वेता तिवारी हिने गेल्या 9 महिन्यांपासून मुलगा रेयांश याला भेटू दिलं नाही… असा आरोप लावला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

 

अभिनव यांच्या म्हणण्यानुसार, श्वेता हिने रेयांश याचे बनावट रिपोर्ट दाखवत, माझा मुलगा मला घाबरत आहे… असा दावा केला. मी श्वेताला 100 पेक्षा अधिक मेल केले आणि मला मुलाला एकदा भेटू दे… अशी विनंती केली. पण तिने मला रेयांश याला भेटू दिलं नाही. मी श्वेताच्या पाया पडायला देखील तयार होतो.. असं देखील अभिनव म्हणाला.

‘माध्यमांसमोर श्वेता विक्टिम कार्ड खेळत असते. पलक माझी सावत्र मुलगी आहे. पण मी कायम तिला वडिलांप्रमाणे प्रेम दिलं. वडिलांचं कर्तव्य मी पूर्ण केलं. श्वेताने मला माझ्या मुलांपासून दूर केलं आहे…’ असं देखील श्वेताचा दुसरा पती अभिनव कोहली म्हणाला होता.

सांगायचं झालं तर, श्वेता तिवारी हिने 2019 मध्ये दुसऱ्या पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर श्वेता दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनेत्री मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते.

श्वेता तिवारी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील श्वेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्याच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;