अडल्ट स्टार रिया बर्डे सोबत राज कुंद्राचं कनेक्शन? स्पष्टीकरण देत म्हणाला…

अडल्ट स्टार रिया बर्डे सोबत राज कुंद्राचं कनेक्शन? स्पष्टीकरण देत म्हणाला…

अडल्ट सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेख हिला ठाण्यातील उल्हासनगरमधून पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. रिया भारतात नाव बदलून राहत होती. रिया हिने बनावट कागदपत्रे वापरून भारतीय पासपोर्ट मिळवला आणि रिया भारतीय नसून बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. याप्रकरणी आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. रिया बर्डे प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा यांचं नाव देखील समोर आलं. यावर राज याने स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा म्हणाला, ‘माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या बातम्यांमुळे मी अत्यंत त्रासलो आहे. याठिकाणी मला स्पष्ट करायचं आहे की, संबंधित महिलेला मी कधी भेटलो नाही आणि अशी कोणताही प्रॉडक्शन कंपनी माझ्या मालकी हक्काची नाही. ज्यासाठी या महिलेने काम केलं आहे. करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही. माझी प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी मला प्रकरणात रोवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मी माझा व्यवसाय प्रामाणिकपणे केला आहे आणि करत आहे. माझ्यावर होत असलेले खोटे आरोप मी सहन करणार नाही,’ असं देखील राज कुंद्रा म्हणाला.

राज कुंद्रा याच्या वकिलांचं वक्तव्य

राज कुंद्रा याचे वकील प्रशांत पाटील यांच्या वक्तव्यानुसार, ‘बनावट रिपोर्टमध्ये माझे क्लायंट शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राज कुंद्रा यांचं नाव आरोपीसोबत जोडलं जात आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही. याठिकाणी फक्त माझ्या क्लायंटला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज कुंद्रा आणि आरोपीचा कोणताही संबंध नाही…’ असं देखील वकील म्हणाले आहेत.

एवढंच नाही तर, बदनामी करण्याच्या उद्देशाने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांविरोधात गुन्हा दाख केला जाईल… असं देखील राज कुंद्रा याचे वकील म्हणाले आहेत. सध्या सर्वत्र राज कुंद्रा आणि रिया बर्डे यांच्या कनेक्शनची चर्चा रंगली आहे. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत… असं देखील राज कुंद्रा आणि त्याच्या वकिलांना स्पष्ट केलं आहे.

राज कुंद्रावर झालेले आरोप

बांगलादेशी मॉडल रिया बर्डे हिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्या प्रॉडक्शन हाउसमध्ये देखील काम केल्याची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला तुरुंगवास भोगावा लागला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;