व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना ठाणे पोलिसांकडून अटक

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना ठाणे पोलिसांकडून अटक

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांवर एंबरग्रीस तस्करीच्या गुन्ह्याखाली ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या उलटीची किंमत कोट्यावधींमध्ये असल्याचे समजते. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठाणे पोलीस कार्यालयाकडून सांगण्यात आले की, 27 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरक्षक दत्ताराम भोसले यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की, काही लोक दुपारी दोनच्या सुमारास वॅगनार कारमधून डोंबिवली परिसरात व्हेलच्या उलटी विकण्यासाठी येणार आहेत. यानंतर ठाणे पोलिसांनी घटनास्थळ गाठून वॅगनार कारमधून बॅगेत ठेवलेला अंबरग्रीस जप्त केला. यासोबतच तिघांना अटक देखील करण्यात आली. यामध्ये अनिल भोसले (55), अंकुश शंकर माळी  (45) आणि  लक्ष्मण शंकर पाटील (63) अशी आरोपींची नावे आहेत.

परफ्यूम उत्पादक कंपन्यांमध्ये याला मोठी मागणी आहे. याचा उपयोग परफ्यूमला दीर्घकाळ सुरक्षित आणि सुगंधित ठेवण्यासाठी केला जातो. त्यामुळे कंपन्या त्यासाठी जास्त किंमत मोजायला तयार आहेत. याशिवाय व्हेलच्या उलटीचा उपयोग औषधे बनवण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर महागडी दारू आणि सिगारेट बनवण्यातही त्याचा उपयोग होतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;