नगरमधील 15 गावांचा डंका

नगरमधील 15 गावांचा डंका

‘माझी वसुंधरा अभियाना’त नगर जिह्यातील 15 ग्रामपंचायतींना 6.15 कोटी रुपयांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यासह राज्यात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल नगर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांना राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा व नाशिक विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात झाला.

नगर जिह्यात ‘माझी वसुंधरा अभियान’ जिल्हा परिषदेने सीईओ आशीष येरेकर यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे ग्रामीण भागात उत्कृष्ट कामकाज करण्यात आले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नोडल अधिकारी समर्थ शेवाळे, जिल्हा समन्वयक रवींद्र ठाणगे यांच्यासह गटविकास अधिकारी, सरपंच यांनी योगदान दिले आहे. दरम्यान,  ग्रामपंचायतींना मिळालेल्या बक्षिसांची रक्कम ही हरित क्षेत्र वाढवण्यासाठी, पर्यावरणपूरक उपायोजनांसाठी वापरण्यात येणार आहे.

विजेत्या ग्रामपंचायती, कंसात तालुका व मिळालेले बक्षीस ः घुलेवाडी (संगमनेर, 75 लाख), मिरजगाव (कर्जत, 75 लाख),  लोणी बुद्रूक (राहाता, 50 लाख), गुंजाळवाडी (संगमनेर, 15 लाख), वाघोली (शेवगाव, 50 लाख), खांडगाव (संगमनेर, 50 लाख), आव्हाने बुद्रूक (50 लाख), पेमगिरी (संगमनेर 15 लाख), चिंचोली गुरव (संगमनेर 15 लाख), लोणारे (संगमनेर 15 लाख), तिगाव (संगमनेर 50 लाख), जाफराबाद (श्रीरामपूर 50 लाख), चौकाते (15 लाख), धांदरफळ बुद्रूक (संगमनेर 15 लाख), संवत्सर (कोपरगाव 75 लाख).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;