Dharmaveer 2 Box Office Collection: पहिल्याच दिवशी ‘धर्मवीर 2’ सिनेमाची छप्परफाड कमाई, आकडा थक्क करणारा

Dharmaveer 2 Box Office Collection:  पहिल्याच दिवशी ‘धर्मवीर 2’ सिनेमाची छप्परफाड कमाई, आकडा थक्क करणारा

Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त फक्त ‘धर्मवीर’ सिनेमाची चर्चा होती. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. अखेर सिनेमा 27 सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांची प्रतीक्षा संपली. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी देखील सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी केली आहे. शिवाय सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहे. आकडे पाहिल्यानंतर कळत आहे की, सध्या बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

रिपोर्टनुसार, ‘धर्मवीर 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 1 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी देखील पहिल्या दिवशी सिनेमाने केलेल्या कमाईचे आकडे जाहिर केले आहे. तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, ‘धर्मवीर 2’ सिनेमाने पहिल्या दिवशी 1.92 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. शिवाय आज रविवार असल्यामुळे अधिक कमाई होईल… अशी देखील शक्यता वर्तवली आहे. सध्या सर्वत्र ‘धर्मवीर 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

 

 

‘धर्मवीर 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 1.92 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. तर सिनेमा 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात आला आहे. त्यामुळे आता येत्या दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘धर्मवीर 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा ‘धर्मवीर’ सिनेमाचा सिक्वल आहे. सिनेमात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची जीवनपट उलगडण्यात आला आहे. , ‘धरमवीर’ सिनेमा प्रवीण तरडे यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला. तर सिनेमात प्रसाद ओक, क्षितीश दाते, मकरंद पाध्ये, स्नेहल तरडे, आणि श्रुती मराठे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

आनंद दिघे यांचं ऑगस्ट 2001 मध्ये ठाण्यातील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ‘धर्मवीर 2’ सिनेमामध्ये त्यांच्या आयुष्याशी आणि राजकीय कारकिर्दीशी निगडीत गोष्टी मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;