आरोग्य क्षेत्रात ‘माता यशोदा’चे काम गौरवास्पद, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी केले कौतुक

आरोग्य क्षेत्रात ‘माता यशोदा’चे काम गौरवास्पद, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी केले कौतुक

आरोग्य व स्वच्छतेचा प्रसार करणाऱ्या 31 व्या ‘माता यशोदा आरोग्य अंकाचे’ प्रकाशन मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते नुकतेच भायखळा येथील हेरिटेज सभागृहात संपन्न झाले. आरोग्य व सामाजिक क्षेत्रात ‘माता यशोदा’च्या माध्यमातून श्रीकृष्ण हरचांदे यांचे सुरू असलेले काम गौरवास्पद असल्याचे देवेन भारती यावेळी म्हणाले.

श्रीकृष्ण हरचांदे यांच्या नेतृत्वाखाली समाजप्रबोधनाच्या हेतूने प्रकाशित करण्यात येणाऱ्या या अंकात महाराष्ट्रातील नामवंत डॉक्टर्स विविध आजारांबाबतची माहिती व प्रतिबंधात्मक उपाय याबाबतचे विचार लेखातून मांडत असतात. अंकाच्या प्रकाशन सोहळय़ावेळी उद्योजक नवीन मडीया, डॉ. रेखा डावर, डॉ. गुस्ताद डावर, आमदार अॅड. आशीष शेलार, विनोद शेलार, माता यशोदाच्या अरुणा हरचांदे, डॉ. पिनाकिन गुजर यांची उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;