कुलगाममधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी

कुलगाममधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी

कश्मीरच्या कुलगाममधील शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत लष्कराचे 3 जवान आणि कुलगामचे एएसपी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी श्रीनगरला हलवण्यात आले आहे.

कुलगाम येथील आदिगाम देवसर भागात दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी आदिगाममध्ये शोधमोहीम राबवली. सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;