शबाना आझमी यांच्या ‘त्या’ विधानाने मोठ्या वादाला तोंड?, थेट म्हणाल्या, भारतात कायमच महिलांना…

शबाना आझमी यांच्या ‘त्या’ विधानाने मोठ्या वादाला तोंड?, थेट म्हणाल्या, भारतात कायमच महिलांना…

IIFA अवॉर्ड्स 2024 हे सध्या अबुधाबीमध्ये सुरू आहेत. या पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार हे IIFA अवॉर्ड्स 2024 साठी अबुधाबीमध्ये पोहोचले आहेत. कालच या पुरस्कार सोहळ्याला सुरूवात झालीये. 29 सप्टेंबर 2024 ला या पुरस्कार सोहळ्याची सांगता होईल. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला तिच्या अभिनयासाठी पुरस्कार देखील मिळालाय. करण जोहर आणि शाहरूख खान होस्ट करताना दिसत आहेत. लोकांमध्ये या IIFA अवॉर्ड्स 2024 बद्दल क्रेझ नक्कीच बघायला मिळतंय.

जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी शबाना आझमी या देखील अबुधाबीमध्ये पोहोचल्या आहेत. मेगास्टार अभिनेता चिरंजीवी याला जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या हस्तेच पुरस्कार देण्यात आलाय. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हे नक्कीच बघायला मिळतंय. चाहते अभिनेत्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. 

आता नुकताच अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड्सवेळी माध्यमांशी संवाद साधताना शबाना आझमी यांनी हेमा समितीच्या अहवालावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे, ज्याची तूफान चर्चा रंगताना दिसतंय. शबाना आझमी या म्हणाल्या की, मुळात म्हणजे तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की, भारतातील महिलांचा स्वत:चा त्यांचा एक प्रवास शतकानुशकते चालत आलेला आहे.

 16व्या ते 21व्या शतकापर्यंत त्यांची प्रगती झाली, पण त्यांना दडपण्यात आले. असेही म्हणतात की, भारतातल्या स्त्रिया या भारताप्रमाणेच भारतातही प्रगती आणि अत्याचाराचे प्रतीक आहेत…शबाना आझमी या मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिला कलाकारांशी संबंधित हेमा समितीच्या अहवालाबाबत हे बोलत होत्या. 

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिला कलाकारांचे शोषण होत असल्याचा मुद्दा तूफान चर्चेत दिसतोय. हेच नाही तर काही गंभीर आरोपही करण्यात आले. यावेळी शबाना आझमी यांनी त्यांचा एक जुना चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याच्या गोष्टीवर जोर दिल्याचे देखील बघायला मिळाले. शबाना आझमी हे महिलांविषयी कोणताही मुद्दा असो त्या आपले मत मांडताना कायमच दिसतात. 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;