Nagar News – कोपरगावात मोकाट जनावरांच्या झुंजीत एक जण गंभीर जखमी

Nagar News – कोपरगावात मोकाट जनावरांच्या झुंजीत एक जण गंभीर जखमी

कोपरगावात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला आहे. या जनावरांच्या झुंजीत एक रहिवासी गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरांच्या झुंजीमध्ये दुचाकीस्वार आणि महिला किरकोळ जखमी झाल्या होत्या. त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने नावापुरती मोकाट जनावरांना पकडण्याची नाममाञ मोहीम हाती घेतली होती.

मात्र शनिवारी पुन्हा मोकाट जनावरांमुळे एक जण जखमी झाला. मौलाना जैद इलियास खाटीक हे पूजापाठ आवरून घरी जात असताना मोकाट जनावरांच्या झुंजीत सापडल्याने ते गंभीर जखमी झाले.

सध्या कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर असून नगरपालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. ही जनावरे ग्रामपंचायत कोंडवाड्यात घालावी. नागरिकांना सुरक्षित वावर करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;