Koaprgaon News – इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याला प्राचार्यांची बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Koaprgaon News – इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याला प्राचार्यांची बेदम मारहाण, गुन्हा दाखल

कोपरगाव तालुक्यातील एका खासगी शाळेतील इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला प्राचार्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याच्या पाठीवर व्रण उठले आहेत. या प्रकरणी प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना कोपरगाव तालुक्यातील रेनबो इंटरनॅशन स्कुलमध्ये घडली आहे. दवंगे सर असे आरोपी प्राचार्यांचे नाव आहे. पीडित मुलगा सतत भांडतो, मस्ती करतो या रागातून त्यांनी मुलाला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलगा इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत असून आठ वर्षांचा आहे. प्राचार्यांनी बेदम मारहाण केल्याने त्याच्या हातपाय आणि मांडीवर मारल्याचे व्रण उठले आहेत. त्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला असून त्यांनी तत्काळ कोपरगाव पोसील स्टेशनमध्ये प्राचार्य दवंगे सर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची पोलीस चौकशी करत असून अद्याप प्राचार्यांना अटक करण्यात आलेले नाही. प्राचार्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;