सैफ अली खान याच्याकडून अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला, माझ्या…

सैफ अली खान याच्याकडून अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला, माझ्या…

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सैफ अली खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. देवरा चित्रपटामुळे सध्या सैफ चर्चेत आहे. सैफ अली खान हा कायमच आपल्या चारही मुलांना वेळ देताना दिसतो. रक्षाबंधनच्या दिवशीच सैफ अली खान याच्या घरी आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी सारा अली खान ही पोहोचली होती. यावेळीचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले. सैफ अली खान हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. करीना कपूर ही सोशल मीडियावर सैफ अली खानसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

नुकताच आता सैफ अली खान याच्याकडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय. सैफ अली खान म्हणाला की, माझे वडील मंसूर अली खान यांनी मला अगोदरच सांगितले होते की, त्याला विरासतमध्ये मिळालेल्या पैशांवर अवलंबून राहायचे नाहीये. त्यांनी मला चांगले शिक्षण द्यायची प्रॉमिस केले होते आणि ते त्यांनी पूर्ण देखील केले.

पण पैशांच्या बाबत त्यांनी मला स्पष्ट सांगितले होते की, मला स्वत:ला ओळख निर्माण करावी लागेल. पुढे सैफ अली खान हा म्हणाला की, माझ्या वडिलांना काहीतरी मी वेगळेच बनावे असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, मला अगोदरपासूनच अभिनय आवडत. बहुतेक हे शर्मिला टागोरमुळे असावे.

सैफ अली खान हा म्हणाला की, मी माझा पहिला चित्रपट 1992 मध्ये केला. तेंव्हापासून बरेच काही बदलले. मी इंग्लंडमधील एका बोर्डिंग स्कूलमधून निघालो होतो. माझ्या वडिलांनी एक वेगळेच माझे भविष्य निर्माण करण्यासाठी खूप जास्त पैसा खर्च केला होता. कोणी मला विचारले नव्हते की, तुला काय करायचे आहे.

हा नक्कीच मला माझ्या पायावर उभा राहण्यास थोडा जास्त वेळ लागला. एक वेळ असा आला की, मी स्वत:ला सांभाळले आणि मी एक चांगला अभिनेता झालो. पटोदी पॅलेसबद्दल बोलताना सैफ अली खान हा म्हणाला की, माझ्या वडिलांना सुरूवातीपासूनच पटोदी पॅलेसला एक हॉटेल बनवायचे होते. पण यासाठी माझ्या आजीचा विरोध होता. आता सैफच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;