‘IIFA अवॉर्ड्स 2024’मध्ये चिरंजीवीचा धमाका, भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी अभिनेत्याला पुरस्कार…

‘IIFA अवॉर्ड्स 2024’मध्ये चिरंजीवीचा धमाका, भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी अभिनेत्याला पुरस्कार…

अबुधाबीमध्ये IIFA अवॉर्ड्स 2024 धमाकेदार पद्धतीने सुरू आहे. अनेक दिग्गज कलाकार या पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचले आहेत. साऊथच्या कलाकारांचा या पुरस्कार सोहळ्यात एक दबदबा बघायला मिळतोय. IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये मेगास्टार चिरंजीवीला भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आलाय. चिरंजीवीने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट दिली आहेत. विशेष म्हणजे चिरंजीवीचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. आता अभिनेत्याला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.IIFA अवॉर्ड्स 2024 मधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

Chiranjeevi

विशेष म्हणजे अभिनेता चिरंजीवी याला हा पुरस्कार प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते देण्यात आला. IIFA इंस्टाग्राम अकाऊंटवर याचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. अभिनेत्री शबाना आझमी देखील यावेळी स्टेजवर दिसत आहे. चिरंजीवीने त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट दिली आहेत. 

Chiranjeevi

चिरंजीवीच्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत 156 चित्रपट, 537 गाणी अभिनय क्षेत्राला दिली आहेत. अबुधाबीमध्ये IIFA अवॉर्ड्स 2024 सुरू आहेत. आज या पुरस्कार सोहळ्याचा दुसरा दिवस आहे. विशेष म्हणजे IIFA अवॉर्ड्स 2024 ला पहिल्या दिवशी राणा दग्गुबती आणि तेजा सज्जा यांनी होस्ट केले. अजून दोन दिवस हा पुरस्कार सोहळा सुरू असणार आहे. आता शाहरुख खान, करण जोहर आणि विकी कौशल हे पुढे पुरस्कार सोहळ्याला होस्ट करताना दिसणार आहेत.

Chiranjeevi

29 सप्टेंबर 2024 रोजी पुरस्कार सोहळा संपेल. या पुरस्कार सोहळ्याकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्याचे देखील बघायला मिळतंय. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला देखील तिच्या अभिनयासाठी पुरस्कार मिळालाय. आऊटस्टॅंडिंग अचीवमेंट इन इंडियन सिनेमा हा पुरस्कार चिरंजीवीला मिळाला आहे.

Chiranjeevi

आपल्या आवडत्या अभिनेत्याला पुरस्कार मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय. चिरंजीवीला पुरस्कार मिळतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करून अभिनेत्याचे काैतुक करताना दिसत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत या पुरस्कार सोहळ्यात दाखल झालीये. 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;