‘धर्मवीर’ सिनेमावर वाद, सुषमा अंधारे यांचं ट्विट, प्रवीण तरडे म्हणाले, ‘दिघे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’

‘धर्मवीर’ सिनेमावर वाद, सुषमा अंधारे यांचं ट्विट, प्रवीण तरडे म्हणाले, ‘दिघे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’

धर्मवीरच्या यशानंतर आता धर्मवीर-2 हा सिनेमा आला आहे. या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. सिनेमा 27 सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. पण सिनेमा प्रदर्शित होताच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. यावर सिनेमाचे दिग्दर्शत प्रवीण तरडे यांनी देखील उत्तर दिलं आहे. चित्रपटात कुणाचं नाव घेतलं नाही, अंधारे यांचा गैरसमज झाला आहे. विरोधकांनी चित्रपट पाहिला तर त्यांनाही आवडेल. माझ्या शिवसेना प्रवेशामुळे गद्दारी झाल्याचं कारण तरडे यांनी चित्रपटात दाखवल्याचं ट्विट अंधारे यांनी केलं आहे. यावर प्रवीण तरडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रविण तरडे म्हणाले, ‘सुषमा ताईंनी बहुदा सिनेमा पाहिलेला नाही. त्यांनी कुणाकडून तरी ऐकलं असेल, सिनेमा पाहिल्यानंतर जर तो संवाद नीट ऐकला, तर कळेल की त्या संपूर्ण सीनमध्ये कोणाचं नाव घेतलेलं नाही… मला देखील आश्चर्य वाटलं की सुषमा ताई असं म्हणाल्या. पण त्यांचं जे काही काम आहे त्या एका राजकीय पक्षाचं काम करतात. मी अजिबात कुठेही कोणाचं नाव घेतलेलं नाही. सिनेमा पाहा तो सीन काय आहे ते पाहा.. सिनेमा पाहिल्यानंतर कोणाला कोणता प्रश्नच पडणार नाही…’

पुढे तरडे म्हणाले, ‘ज्यांनी सिनेमा पाहिला आहे, त्यांना कोणालाही प्रश्न पडलेला नाही. विरोधकांनी सिनेमा पाहिला तर, विराधकांना देखील सिनेमा आवडेल… कारण ती दिघे साहेबांच्या, बाळा साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे.आम्ही सिनेमा बनवला आहे. त्यामुळे सिनेमा पाहिल्यानंतर कोणाला प्रश्न पडणार नाही…’ असं देखील तरडे म्हणले…

सुषमा अंधारे यांचं ट्विट

 

‘धर्मवीर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ट्विट करत अंधारे म्हणाल्या, ‘शिवसेनेत माझा प्रवेश हा गद्दारी झाल्यानंतर म्हणजे 28जुलै22ला झाला. पण मतांसाठी निवडणुकिसाठी थुकरट युक्ती तरडेनी दाखवली आहे. @mieknathshinde सांगताहेत गद्दारीचा एक कारण सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या..!! प्रवीण तरडेजी कलेशी बेईमानी म्हणतात ती हीच का?’ असं ट्विट अंधारे यांनी केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;