अखेर ऐश्वर्या राय हिने केला मोठा खुलासा, थेट म्हणाली, माझी मुलगी…

अखेर ऐश्वर्या राय हिने केला मोठा खुलासा, थेट म्हणाली, माझी मुलगी…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर काही रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट झालाय. आता जलसा बंगल्यानंतर ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरी शिफ्ट झालीये. घटस्फोटाच्या सतत चर्चा असताना देखील त्यावर भाष्य करणे ऐश्वर्या राय हिच्याकडून टाळण्यात आलंय.

ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन अबुधाबीमध्ये IFA अवॉर्ड्स 2024 पोहोचली आहे. कोणताही पुरस्कार सोहळा असो तिथे ऐश्वर्या हिच्यासोबत आराध्या बच्चन ही कायमच दिसते.  IFA अवॉर्ड्स 2024 मध्ये ऐश्वर्या राय ही लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत फोटोसाठी खास पोझ देताना दिसली. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

फोटोसाठी आराध्या हिच्यासोबत पोझ देत असतानाच ऐश्वर्या राय हिला आराध्या हिच्याबद्दल अत्यंत मोठा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर ऐश्वर्या हिने असे उत्तर दिले की, सर्वांचीच बोलती बंद झाल्याचे बघायला मिळाले. आता ऐश्वर्या राय हिच्याच विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.  रिपोर्टर म्हणाला, ती (आराध्या) नेहमी तुझ्यासोबत असते.. ती बेस्टकडून शिकत आहे…

रिपोर्टरचा प्रश्न पूर्ण होण्याच्या अगोदरच ऐश्वर्या राय ही म्हणाली की, व्वा… ती माझी मुलगी आहे, ती नेहमी माझ्यासोबत असते…ऐश्वर्या राय हिच्या या उत्तराची जोरदार चर्चा आता रंगताना दिसत आहे. लेकीबद्दल पुढे काही न ऐकताच ऐश्वर्या ही आपले उत्तर देताना दिसत आहे. आता त्याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

लोक ऐश्वर्या राय हिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. मध्यंतरी आराध्या बच्चन हिची एकच हेअरस्टाईल यामुळे लोक ऐश्वर्याला खडेबोल सुनावताना दिसले. त्यानंतर अनंत अंबानी याच्या प्री वेडिंगमध्ये खास लूकमध्ये आराध्या बच्चन ही दिसली होती. लोकांना आराध्याचा लूक प्रचंड आवडला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;