लता मंगेशकर यांची ‘प्रेम कहाणी’ का राहिली अधुरी? त्यांच्यावर झालेला विष प्रयोग आणि बरंच काही…

लता मंगेशकर यांची ‘प्रेम कहाणी’ का राहिली अधुरी? त्यांच्यावर झालेला विष प्रयोग आणि बरंच काही…

Lata Mangeshkar: ‘मुझसे जुदा होकर’, ‘मैं तेरा दुश्मन’, ‘कोई लडका हैं’, ‘जिसका मुझे था इंतजार’, ‘हमको हमीसे चुरालो…’ अशी असंख्या गाणी भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायली. आज दीदी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांनी गायलेली गाणी आयुष्य जगायला शिकवतात. लतादीदींच्या निधनाला जवळपास दोन वर्ष पूर्ण झाली आहे. तरी देखील दीदी आपल्यातच आहेत… आशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. आज दीदी यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

दीदी त्यांच्या करियरमध्ये यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या. पण शिखरावर पोहोचतना त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. लाता दीदी यांची अधुरी राहिलेली प्रेम कहाणी ते त्यांच्यावर झालेल्या विष प्रयोगाबद्दल अनेक गोष्टी आज जाणून घेऊ…

असं सांगितलं जातं की, लता मंगेशकर आणि दिवंगत क्रिकेटर आणि BCCI ते माजी अध्यक्ष राज सिंग दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होती. पण राज सिंग यांचे वडील महरावल लक्ष्मण सिंग यांना त्यांच्या मुलाचं लता दीदी यांच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.

आपल्या मुलाचं लग्न देखील शाही घराण्यात झालं पाहिजे… अशी महरावल लक्ष्मण सिंग यांची इच्छा होती. याच कारणामुळे लता मंगेशकर आणि राज सिंग यांनी कधीच लग्न केलं नाही. दोघे देखील शेवटच्या क्षणापर्यंत एकटेच राहिले…

‘ऐसा कहां से लाऊं’ पुस्तकात लिहिल्याप्रमाणे लता मंगेशकर यांच्यावर 1962 मध्ये विष प्रयोग करण्यात आला होता. तेव्हा दीदी फक्त 33 वर्षांच्या होत्या. एके दिवशी दीदी यांच्या अचानक पोटात दुखू लागलं आणि त्यांनी तीन वेळा उल्ट्या केल्या. तेव्हा तात्काळ डॉक्टरांना बोलावण्यात आलं आणि त्यानंतर निदान झालं की, लता दीदी यांच्यावर विष प्रयोग झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच घरातील कूक फरार झाला. त्यानंतर गीतकार मजरुह सुल्तानपुरी रोज संध्याकाळी 6 वाजता दीदी यांच्या घरी यायचे. आधी स्वतः जेवायचे त्यानंतर दीदी जेवायच्या… असा खुलासा खुद्द दीदींनी एका मुलाखतीत केला होता.

लता दीदी यांचं क्रिकेटवर विशेष प्रेम होतं. दीदी क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांच्या चाहत्या होत्या. दीदी म्हणाल्या होत्या, ‘जेव्हा भारत कोणता सामना हारतो, तेव्हा माझा मू़ड खराब होतो आणि तो पुन्हा ठिक होण्यासाठी फार वेळ लागतो…’ या दीदींच्या आठवणी कधीही विसरता येणार नाहीत.

सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर आजही दीदी यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आज दीदी आपल्यात नसल्या तरी, आयुष्यात कितीही संकटं आली तरी पुढे चालत राहायचं… हे दीदी यांनी शिकवलं आहे. सांगायचं झालं तर, एका कलाकाराचं निधन कधीच होत नाही. कलाकाराची कला कायम जिवंत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;