ऐश्वर्या राय हिने लेकीसाठी केले ‘हे’ काम, आराध्या बच्चन आणि अभिनेत्री…

ऐश्वर्या राय हिने लेकीसाठी केले ‘हे’ काम, आराध्या बच्चन आणि अभिनेत्री…

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. यादरम्यानच ऐश्वर्या राय ही विदेशात जाताना दिसत आहे. ऐश्वर्या राय ही नुकताच मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत अबुधाबीला IFA अवॉर्ड्स 2024 साठी गेलीये. अबुधाबीला जाताना मुंबई विमानतळावर ऐश्वर्या राय आणि आराध्या या दोघी स्पॉट झाल्या. चाहत्यांना दोघींचाही लूक जबरदस्त आवडलाय. बेस्ट अभिनयासाठी काही दिवसांपूर्वीच एक पुरस्कार ऐश्वर्या राय हिला मिळाला.

ऐश्वर्या राय हिच्यासोबत सतत आराध्या ही सध्या स्पॉट होताना दिसतंय. आता नुकताच ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये दोघी मायलेकी जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहेत. ऐश्वर्या ही लेकीसोबत फोटोसाठी पोझ देताना देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेच नाही तर मुलगी आराध्या हिचे केस व्यवस्थित करताना एका व्हिडीओमध्ये ऐश्वर्या ही दिसत आहे. मुलीची काळजी घेतानाही अभिनेत्री दिसत आहे. यानंतर ऐश्वर्या राय ही आराध्यासोबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. त्यानंतर लेकीचा हात पकडून जातानाही व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही स्पष्ट दिसत आहे. पुरस्कार सोहळ्यात देखील आराध्या ही आईच्या शेजारीच बसली आहे.

ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन सोडल्या तर बच्चन कुटुंबियांपैकी इतर कोणीही IFA अवॉर्ड्स 2024 मध्ये पोहोचले नाहीये. कोणताही पुरस्कार सोहळा असून किंवा इतर काहीही असो सध्या ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत पोहोचते. सतत ऐश्वर्यासोबत फिरत असल्याने आराध्या नेमकी शाळेत कधी जाते हा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जातोय.

ऐश्वर्या राय ही अनंत अंबानी याच्या लग्नात देखील मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबतच पोहोचली होती. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्येही जया बच्चन श्वेता बच्चन या सहभागी झाल्या आहेत. मात्र, ऐश्वर्या राय ही नव्याच्या शोमध्ये कधीच सहभागी झाली नाही. हेच नाही तर मामी ऐश्वर्याबद्दल शोमध्ये बोलणेही टाळताना कायमच नव्या दिसते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;