रणबीर कपूर – कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या तयारीत असलेली बेबो, पण…, व्हिडीओ पाहून म्हणाल…

रणबीर कपूर – कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या तयारीत असलेली बेबो, पण…, व्हिडीओ पाहून म्हणाल…

अभिनेता रणबीर कपूर याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेता त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला. आज रणबीर पत्नी आलिया भट्ट आणि लेक राहा कपूर यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा रणबीर कपूर याच्या नावाची चर्चा अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत रंगली होती. एवढंच नाही तर, रणबीर कपूर याच्यासाठी कतरिना हिने अभिनेता सलमान खान याच्यासोबत असलेलं नातं देखील संपवलं होतं. रणबीर सोबत लग्न करण्याचं स्वप्न देखील अभिनेत्रीने पाहिले होते.

सांगायचं झालं तर, फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील कतरिना – रणबीर यांच्या नात्याच्या चर्चा होत्या. चाहते दोघांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत देखील होते. पण दोघांचं लग्न झालं नाही. रिपोर्टनुसार, रणबीर – कतरिना लिव्हइन रिलेशनशिपमध्ये देखील होते.

दरम्यान सोशल मीडियावर अभिनेत्री करीना कपूर हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये करीना, रणबीर आणि कतरिना यांच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. ‘कॉफी विथ करण’ शोमधील हा व्हिडीओ आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त व्हिडीओची चर्चा आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by v7 (@celeb_coffee_chat)

 

करीना, रणबीर याला म्हणते, ‘तुझ्या लग्नात मी एकटी डान्स करणार आहे. चिकनी चमेली… शिला की जवानी.. कतरिनाच्या हीट गाण्यांवर मी एकटी डान्स करणार आहे…’ यावर हसत रणबीर म्हणतो, ‘इतकी बोलत आहेस… जर होणार असेल तर…’ यावर करण जोहर म्हणतो, ‘आम्ही देखील हेच म्हणत आहोत की, लग्न होणार आहे… पण कधी?’

पुढे करीना, रणबीर याला म्हणते, ‘मला तुला एक गोष्ट सांगायची आहे… माझी पूर्ण तयारी झाली आहे… माझे आउटफिट देखील रेडी आहेत…’, यावर रणबीर देखील होकार देतो आणि हसू लागतो. सांगायचं झालं तर, तेव्हा प्रत्येक जण रणबीर आणि कतरिना यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत होते. पण दोघांचं लग्न झालं.

अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर याच्या आयुष्यात कतरिना हिची एन्ट्री झाली. दोघांनी एकमेकांना जवळपास 7 वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

कतरिना सोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर याच्या आयुष्यात आलिया हिची एन्ट्री झाली. दोघांनी एमकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. त्यानंतर दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न देखील केलं. आलिया – रणबीर यांना एक मुलगी देखील आहे. राहा कपूर असं दोघांच्या मुलीचं नाव आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;