दागिने हिसकावून चोरांचे मुंबई-सोलापूर-पुणे, घाटकोपर पोलिसांनी शिताफीने पकडले

दागिने हिसकावून चोरांचे मुंबई-सोलापूर-पुणे, घाटकोपर पोलिसांनी शिताफीने पकडले

घाटकोपर येथे रिक्षाने प्रवास करणाऱ्या दोघा महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून दोघे चोर सटकले. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी थेट सोलापूर गाठले. तेथून पुन्हा ते मुंबईला निघाले, पण घाटकोपर पोलिसांनी दोघांना पुण्यातच उचलले.

दोन महिला रिक्षाने प्रवास करत होत्या. रिक्षा अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील संघाणी जंक्शन सिग्नल येथे आली असता पायी चालत आलेल्या दोघांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन व मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. त्यामुळे महिलांनी तत्काळ घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास तिरमारे व पथकाने तपास सुरू केला.

पथकाने परिसरातील 70 ते 80 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच खबऱ्यांना कामाला लावले. तेव्हा सदरचे आरोपी हे सोलापूरला पळून गेल्याचे समजले. त्यामुळे पथकाने तत्काळ सोलापूरच्या दिशेने धाव घेतली, पण तेथे गेल्यावर आरोपी मुंबईला निघाल्याचे समजले. आरोपी हे हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेसने जात असल्याचे समजताच पोलिसांनी पुणे स्थानकातच राहुल लोंढे (21), आकाश कांबळे (25) अशा दोघांना उचलले. दोघेही घाटकोपरमध्येच राहणारे असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;