भाजपच्या संजय पाटलांची राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षाला घरात घुसून मारहाण

भाजपच्या संजय पाटलांची राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षाला घरात घुसून मारहाण

कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना भाजपचे माजी खासदार संजय पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये माजी खासदार संजय पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

माजी खासदार संजय पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला आणि मुलांनाही मारहाण केली, असा आरोप आहे. यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षीय आईला ढकलून दिले, असेही तक्रारीत नमूद केले आहे.

या घटनेनंतर माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्यासह आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तळ ठोकला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी रोहित पाटील यांनी केली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. कवठेमहांकाळ पोलीस तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;