पत्नीवर फेकले फिनाईल

पत्नीवर फेकले फिनाईल

अमली पदार्थाचे व्यसन आणि तृतीयपंथीयांशी असलेले संबंध याच्या वादातून घटस्फोटासाठी पतीने पत्नीवर फिनाईल फेकल्याची घटना घडली. पीडित महिलेवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महिलेच्या पतीला मालवणी पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

पीडित महिला आणि अटक आरोपी याने 2019मध्ये लग्न केले होते. ते पूर्वी नालासोपारा येथे राहत होते. लग्नानंतर महिलेच्या पतीला अमली पदार्थाचे व्यसन लागले. तसेच तो एका तृतीयपंथीयासोबत राहू लागला. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले. तीन महिन्यांपूर्वी महिला मढ येथे तिच्या माहेरी आली. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने घटस्फोट घेण्याचे ठरवले. दोन दिवसांपूर्वी अटक आरोपी हा महिलेच्या घरी आला. त्यानंतर तो घरात घुसला. त्याने महिलेच्या चेहऱ्यावर फिनाईल फेकले.

फिनाईल फेकल्याने तिला त्रास होऊ लागला. महिलेला तत्काळ कूपर रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती समजताच मालवणी पोलीस घटनास्थळी आले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. आरोपीच्या अटकेसाठी एक पथक तयार केले. या पथकाने आरोपीला नाशिक येथून अटक करून मुंबईत आणले. त्याला न्यायालयात हजर केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;