आम्हाला मुंबईच्या खड्ड्यांची सवय…; सुनील गावसकर असं का म्हणाले? वाचा सविस्तर…

आम्हाला मुंबईच्या खड्ड्यांची सवय…; सुनील गावसकर असं का म्हणाले? वाचा सविस्तर…

टीम इंडियाचे दिग्गज माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी लखनौवरून अयोध्येला जाताना आलेला अनुभव सांगितला आहे. यावेळी त्यांनी आम्हाला मुंबईतील खड्ड्यांची सवय असल्याचे म्हटल आहे.

टीम इंडियाविरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये कानपूर येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. सुनील गावसकर गुरूवारी (26 सप्टेंबर 2024) अयोध्येला प्रभु श्री रामाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते आज कानपूरमध्ये समालोचनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी समालोचन करत असताना त्यांनी लखनौवरुन अयोध्येला जात असताना आलेला अनुभव सांगितला.

समालोचन करताना टीम इंडियाचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकने त्यासंदर्भात विचारना केली असता, त्यांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले की, “आम्हाला तर मुंबईच्या खड्ड्यांची सवय आहे. असं वाटतं की मुंबईत रस्ते बनवणाऱ्याची दरवर्षी Benefit Match असते. ते दरवर्षी रस्ते तयार करतात आणि दरवर्षी तिथे खड्डे पडतात.” असं सुनील गावसकर म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;